नवी दिल्ली : ग्रामीण भारतात बदल करण्याच्या हेतूने आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'स्वामित्व' योजना (SVAMITVA Scheme) लाँच करणार आहे. आजपासून या योजनेची सुरुवात होणार आहे. या योजनेत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचं कार्ड दिलं जाणार आहे. आज जवळपास एक लाख भू- संपत्ती मालकांना आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ही लिंक मिळणार आहे. जे 'संपत्ती कार्ड' डाऊनलोड करू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेत दिल्या जाणाऱ्या संपत्तीच्या मालकीच्या कार्डमुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो. आज सकाळी ११ च्या सुमारास या योजनेची सुरूवाच होणार आहे. हा दिवस ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. 



या योजनेतंर्गत ६ राज्याच्या ७६३ गावातील गावकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे ३४६ गावे, हरियाणाचे २२१ गावे, महाराष्ट्रातील १००गावे, मध्य प्रदेशचे ४४ गावे, उत्तराखंडचे ५० गावे आणि कर्नाटकच्या २ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील लाभार्थींना एका दिवसांत फिजिकल कार्ड मिळणार आहे.