PM मोदी रात्री 9 वाजता जनरल रावत यांना वाहणार श्रद्धांजली, NSA आणि सर्व सैन्यदलाचे प्रमुख राहणार उपस्थित
भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर बुधवारी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर भागात कोसळले, त्यात पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाला. इतर 11 सैनिकांचा मृत्यू झाला. जनरल बिपिन रावत डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते, जिथे ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) रात्री 9 वाजता पालम विमानतळावर जनरल रावत (Bipin Rawat) यांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यांच्यासोबत संरक्षणमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्रीही असतील. यादरम्यान एनएसए (NSA) आणि तिन्ही लष्करप्रमुखही उपस्थित राहणार आहेत.
जनरल बिपिन रावत यांच्यासह सर्व शहीद जवानांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत दिल्लीत आणले जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि NSA अजित डोवाल हे CDS जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाऊ शकतात.
जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव सुलूर एअरबेसवर आणण्यात आले. अखेरच्या दर्शनासाठी एअरबेसवर लोकांची गर्दी झाली आहे.
तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन लाईफ सपोर्टवर असून सध्या त्यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आता त्यांना बंगळुरू येथे चांगल्या उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
भारतीय वायुसेनेच्या (IAF) अधिकृत निवेदनानुसार, हेलिकॉप्टर अपघातातून वाचलेल्या 14 जणांपैकी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव आहेत. हेलिकॉप्टर अपघातानंतर त्याला आग लागली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत आज या अपघाताबाबत माहिती दिली. संसदेत माहिती देताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'भारतीय वायुसेनेने (IAF) लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेची तीनस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू आहे. तपास पथक कालच वेलिंग्टनला पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.