नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आजचा हा कार्यक्रम कोरोना व्हायरसच्या वर्तमान स्थितीवर केंद्रित असणार आहे. कोरोनाविरूद्ध युद्धात युवकांच्या सहभागाचं कौतुक करत पंतप्रधान मोदींनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, कोरोनाविरुद्धच्या लढाईत युवा, तरुण सर्वात पुढे असल्याचं म्हटलं आहे. त्याशिवाय त्यांनी 'PM-CARES फंड'मध्ये मदत करणाऱ्यांचंही कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा लढा देण्यासाठी लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी लोकांना 'पीएम केयर्स फंड' (PM-CARES Fund) मध्ये मदत करण्याचंही आवाहन केलं आहे. याद्वारे त्यांनी 'पीएम केयर्स फंड' (PM-CARES Fund)चा अकाऊंट नंबरही जाहीर केला आहे.



पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये त्यांनी, 'भारताच्या स्वस्थ निर्माणासाठी आपातकालीन निधीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व लोक या फंडमध्ये योगदान देऊ शकतात. पीएम केयर्स फंड छोट्याहून छोटं योगदानही स्वीकारतो. यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता आणखी मजबूत होईल' असं म्हटलं आहे. त्याशिवाय त्यांनी ट्विटमध्ये, 'भारताला स्वस्थ बनवण्यााठी आपण कोणतीही कमी ठेवणार नसल्याचंही' सांगितलंय. 



दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व भाजप खासदार कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारद्वारा करण्यात येत असलेल्या कार्यांत मदत करण्यासाठी भाजपाचे सर्व खासदार त्यांच्या खासदार निधीमधून केंद्रीय सहायता निधीला एक कोटी रुपये देणार असल्याचंही सांगितलंय.