नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी घोषणा झाल्यानंतर ट्विट करुन म्हटलं आहे की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, रामनाथ कोविंदजी गरिब, वंचित आणि मागासलेल्या लोकांचा आवाज बनतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक आज राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा झाली.


मागील ३ वर्षापासून कोविंद हे बिहारचे राज्यपाल आहेत. रामनाथ कोविंद हे दलित समाजाचे असून ते मुळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला अमित शाह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू हे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना देण्यात आले होते.