नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची अनौपचारिक शिखर परिषद होते आहे. त्यासाठी 27 तारखेला मोदी 2 दिवस चीनमध्ये जाणार आहेत. वुहान शहरात दोन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेते द्वीपक्षीय संबंधांवर चर्चा होईल इतकंच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा चीन दौरा अचानक ठरला आहे. खरंतर पंतप्रधान मोदी जून महिन्यात चीनच्या क्वांगडोंगमध्ये शांघाई कॉर्पोरेशन शिखर परिषदेसाठी जाणार होते. पण दीड महिना आधीच राष्ट्राच्या मुख्य नेत्यांची दोन दिवस अनौपचारिक बैठक होणं हे डोकलामचा वाद निवळल्यानंतरची दोन्ही देशांमधील वाढलेल्या जवळीक वाढल्याचं द्योतक आहे.