नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या मुद्यावर देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. याशिवाय लॉकडाऊन दरम्यान त्यांनी देशवासियांच्या संयमाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की कोरोना थांबविण्यात आमचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत. मात्र, लॉकडाऊन शिथिल करण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी अधिक कठोर संदेश दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील आठवड्यात लॉकडाऊन अधिक कठोरपणे राबवावे लागेल, असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. पीएम मोदी म्हणाले, 'येत्या एका आठवड्यात कोरोनाविरूद्धचा लढा आणखी कठोरपणे वाढवला जाईल. 20 एप्रिल पर्यंत प्रत्येक पोलीस ठाणे, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्याची बारकाईने तपासणी केली जाईल.


'परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येईल. लॉकडाउनचे किती अनुसरण केले जात आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. जे हॉटस्पॉटस आहेत तेथे परवानगी देणार नाही. 20 एप्रिलपर्यंत समिक्षा करुन सूट देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. परंतु लक्षात ठेवा ही परवानगी सशर्त असेल. लॉकडाऊनचे नियम मोडल्यास सर्व परवानगी त्वरित मागे घेण्यात येईल.'


पंतप्रधान मोदींनी स्पष्ट इशारा दिला आहे की, लॉकडाऊनचे नियम मोडले गेले आणि कोरोनाने जर तुमच्या ठिकाणी पाय ठेवला तर सर्व परवानगी मागे घेण्यात येईल आणि नियम आणखी कठोर करण्यात येतील. म्हणून निष्काळजीपणाने वागू नका किंवा इतरांनाही दुर्लक्ष करू देऊ नका.