कोलकाता : कोलकातामध्ये फेयर प्राईस शॉप ऑनर्स फेडरेशनने जाहीर केलं आहे की, त्यांचे सदस्य लवकरच मोदी विरोधी अभियान सुरु करणार आहेत. यासाठी ते वाराणसीचा दौरा करणार असून पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीआधी मोदींना मोठा झटका दिला आहे. प्रल्हाद मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. प्रल्हाद मोदी ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनचे अध्यष आहेत. फेडरेशनने आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.


30 ऑक्टोबरला पश्चिम बंगाल सरकारने खाद्य साथी योजनेवर चर्चेसाठी बैठक बोलावली होती. यादरम्यान फेडरेशनने ही घोषणा केली आहे. बैठकीला ममता सरकारमधील खाद्यमंत्री ज्योतीप्रिय मल्लिक आणि डमडमचे टीएमसी खासदार सौगत रॉय उपस्थित होते. या बैठकीत फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनचे सचिव बिश्वंभर बसु यांनी घोषणा केली की, फेडरेशनचे सदस्य लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात मोदी विरोधी अभियान सुरु करणार आहेत. मोदी सरकारला पाडण्यासाठी ते टीएमसीला समर्थन करणार आहेत.