विजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मिरी पंडितांबद्दल विधान केलं आहे. काश्मिरी पंडितांचे अधिकार, सन्मान आणि गौरवासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये दिली आहे. जम्मूमधल्या विजापूरमध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली. त्यावेळी मोदींनी सरकार काश्मिरी पंडितांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. आतापर्यंतच्या सरकारांनी जम्मू काश्मीरच्या जनतेच्या मागण्या आणि भावनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही मोदींनी केला. जम्मू काश्मीरमधल्या एम्सच्या उदघाटनासह विविध विकासकामांचं मोदींनी उदघाटन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांनी पुण्यात काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला. काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मिरमध्ये पाठवलं पाहिजे असं वक्तव्य एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी पुण्यात केलं. पण मोदी सरकारनं चार वर्षांत काश्मिरी पंडितांसाठी काय केलं? असा सवाल ओवेसी यांनी यावेळी विचारला. पुण्यात आयोजीत एका कार्यक्रमात 'सेक्युलॅरीजम इन इंडिया' या विषयावर ओवेसी बोलत होते.


भारतात विविधता असल्यामुळे समान नागरी कायदा लागू होऊ शकत नाही, असं मत ओवेसी यांनी व्यक्त केलं. तिहेरी तलाकचा निषेध करतो, त्यात अन्याय होतो. पण धार्मिक भावनेच्या विषयात कायद्याचा धाक दाखवला जातो आणि दुसरीकडे शबरीमला मंदिराच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही धार्मिक भावनेचा आधार घेऊन अंमलबजावणी होत नाही, हा दुटप्पी पणा नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आनंद तेलतुंबडेंना चुकीची अटक करण्यात आली होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी तेलतुंबडेंच्या अटकेवर दिली.