नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे कर्नाटकचे नेते एच डी देवेगौडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्वीटरवर देखील एचडी देवेगौडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाचा प्रोटोकॉल म्हणा, किंवा नरेंद्र मोदी यांची माजी पंतप्रधान म्हणून देवेगौडा यांच्याशी असलेली आत्मियता, पण या कर्नाटकातली राजकीय परिस्थिती पाहता, देवेगौंडांना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय झाला आहे. 


या शुभेच्छांना आता जास्त महत्व


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाला कर्नाटकात बहुमत असलं तरी, स्पष्ट बहुमतपासून भाजपा अजूनही दूर आहे, आणि काँग्रेस आणि भाजपाने एकाच वेळेस जेडीएसकडे पाठिंबा मागितला होता, पण जेडीएसने काँग्रेसला होकार दिला होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या शुभेच्छा या, जेडीएसला गोंजारण्यासाठी आहेत, की एक प्रोटोकॉल म्हणून आहेत हे देखील महत्वाचे आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी एचडी देवेगौडा यांना दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आल्या आहेत.