नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांना फोन करून, त्रिपुरात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजर राहण्यास सांगितलं, पण नायडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली, तेव्हा मोदी यांनी त्यांना सांगितलं की, आपल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल विचार करा.


खासदारांचा राजीनामा आणि...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर नायडू यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितलं, मी चार वर्ष संयम ठेवला आणि मला आशा होती की आंध्र प्रदेश पुनर्गठन अॅक्टनुसार करण्यात आलेल्या आश्वासनाची पुर्तता व्हावी. मात्र आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही. आता खासदारांच्या राजीनाम्यासंबंधी मी आपला निर्णय मागे घेऊ शकत नाही.


मीडियासमोर भाजपविरोधी बोलणे टाळले


यानंतर नायडू यांनी मोदींना सांगितलं की, यानंतरही त्यांच्या जवळ संधी आहे, राजीनामे तेलगू देसमच्या खासदारांपर्यंत सध्या मर्यादीत राहतील, तसेच मीडियासमोर भाजपाविरोधात तुर्तास तरी काही बोलायचं नाही, अशी सूचना तेलगू देसमच्या नेत्यांना नायडूंनी दिली.


आंध्र प्रदेशातील स्थानिक भाजप नेते आधीपासून तेलगू देसम पार्टीसोबत युती करण्यास उत्सुक नव्हते, मात्र ऐनवेळेस युती करण्यात आली, असं सांगण्यात येतं, म्हणून येथे धुसफूस सुरू असते असंही म्हटलं जातं.