मुंबई : सोशल वेबसाईटवर सध्या #FitnessChallenge ट्रेन्डिंगवर आहे. या साखळीत क्रिकेटर विराट कोहली यानं आपला फिटनेस ट्रेनिंग व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चॅलेंज दिलं होतं. याला उत्तर देताना आपण नक्कीच आपलाही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. आपला शब्द पूर्ण करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल वेबसाईटवर आपला फिटनेस फंडा शेअर केलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी दररोज नियमितपणे योगा करतात, हे तर त्यांनी अनेकदा सांगितलंय. परंतु, योगाशिवाय सकाळी पंतप्रधान आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून आपल्या आरोग्याचीही काळजी घेतात. त्यासाठी ते वेगवेगळे सोपे व्यायामही करतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशा पंचतत्वांनी प्रेरित अशा ट्रॅकवहरर आपण नियमितपणे चालतो, असंही हा व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधानांनी म्हटलंय. तसंच श्वसनाचे व्यायामही आपण करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.  



एवढंच नाही तर आपलं फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ही साखळी पुढे सरकवत आणखी काही जणांना हे चॅलेंज स्वीकारण्याचं आव्हान दिलंय.

यामध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, कॉमनवेल्थमध्ये चर्चेत राहिलेली आणि भारताची नंबर वन महिला टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा तसंच ४० वर्षांच्या वरील आयपीएस अधिकाऱ्यांना मोदींनी हे आव्हान दिलंय.