Corona Vaccine : काही आठवड्यातच तयार होईल लस, पंतप्रधानांची घोषणा
स्वदेशी ३ वॅक्सीन देखील वेगवेगळ्या टप्प्यात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
नवी दिल्ली : पुढच्या काही आठवड्यात कोरोना वॅक्सीन तयार होईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) दिले. सर्वात आधी ज्येष्ठ नागरीक आणि कोरोना वॉरियर्सना वॅक्सिन देण्यात येईल असे पंतप्रधानांनी सांगितले. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी राजकीय पक्ष, नेते आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीनंतर पंतप्रधानांनी ही माहिती दिली. साधारण ८ अशा संभाव्य वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. याचे उत्पादन भारतातच होणार आहे. स्वदेशी ३ वॅक्सीन देखील वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यामुळे वॅक्सिनसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही असे पंतप्रधान म्हणाले.
जगाची नजर भारतावर
कोरोना वॅक्सिन संदर्भात जगाची नजर भारतावर आहे. वॅक्सिनसाठी इतर देशांची नाव देखील ऐकू येतायत. पण जगाचे लक्ष कमी किंमतीतील, सर्वात सुरक्षित वॅक्सीनवर आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारतावर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
रशियाच्या कोविड-१९ वॅक्सीन Sputnik V चे क्लिनिकल ट्रायल भारतात सुरु झालंय. यासाठी भारतात Dr. Reddy's आणि RDIF या कंपन्यांना परवानगी मिळालीय. दोन्ही कंपन्यांनी याबद्दल घोषणा केली. Sputnik V वैक्सीनच्या क्लिनिकल ट्रायलची (Adaptive phase 2/3 clinical trials) सुरुवात झालीय. हे ट्रायल मल्टीलेव्हल आणि रॅंडम स्टडीवर असेल. ज्यामध्ये सुरक्षा आणि लसीकरणाच्या अभ्यासही करण्यात येणारेय.
क्लिनिकल रिसर्च पार्टनर म्हणून JSS मेडीकल रिसर्च काम पाहणार आहे. याशिवाय डॉ. रेड्डी यांनी बायोटेक्नोलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टेंस काउंसिल (BIRAC), डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉ़जी (DBT) यांचा सल्ला घेणे आणि वॅक्सिनसाठी BIRAC के डायग्नोस्टिक ट्रायल सेंटरसोबत भागीदारी केलीय.
वॅक्सिन क्लिनिकल ट्रायल डेटाच्या दुसऱ्या अंतरिम विश्लेषणात, पहिल्या डोसच्या २८ दिवसानंतर ही लस ९१.४ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. पहीली लस ४२ दिवसानंतर ९५ टक्क्यांहून अधिक प्रभावी सिद्ध झाले.
या चाचणीत 40 हजार स्वयंसेवक सहभागी घेत असून 22 हजारांना पहीला डोस देण्यात आला असून १९ हजाराहून अधिक लोकांना पहीला आणि दुसरा डोस देण्यात आलाय.
Sputnik V वैक्सीन रशियाच्या गामालेया नेशनल रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीमध्ये बनवण्यात आलीय. या वॅक्सिनची गेल्या ११ ऑगस्टला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडे नोंद झालीय. Sputnik V वैक्सीन ही जगातील पहीली नोंद झालेली वॅक्सिन आहे.