नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ४१ व्या 'मन की बात'मध्ये देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतीय वैज्ञानिकांची आठवण काढली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याकडे बुद्धयान, भास्कर, ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट यांच्यासारखे गणितज्ञ तर मेडिकल विज्ञानात सुश्रुत आणि चरक सारखे व्यक्ती असणं आपल्यासाठी गर्वाची बाब असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं.


महिलांना समान भागीदारी 


डॉ.सीवी रमन यांच्या जन्मदिनी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्या पंतप्रधानांनी दिल्या. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात महिलांना समान भागीदारी मिळणं ही आपली जबाबदारी असल्याचं मतंही त्यांनी व्यक्त केलं.


शेतकऱ्यांना मोबदला 


तसेच गोबरपासून बायो गॅस आणि जैविक खत बनविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलं. कमाईचे हे  नवे साधन आहे. शेतकऱ्यांनाही याचा चांगला मोबदला मिळेल.


ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म


 'गोबरधन'योजनेसाठी ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.