मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला आहे. पंतप्रधानांची ही 78वी मन की बात केली आहे. यावेळी त्यांनी महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्तानं उजाळा दिला. MyGov अॅपवर एक प्रश्नउत्तर स्पर्धा ठेवण्यात आली असून त्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळे निधन झालं. जगभरात ते महान धावपटू म्हणून ओळले जातात. त्यांना कोणीच विसरू शकत नाही असं म्हणत मोदींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मिल्खा सिंग यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली होती. 2014मध्ये ते जेव्हा सूरतमध्ये आले होते तेव्हा आमची भेट झाली. दृढ निश्चय, बुद्धीमत्ता, स्पोर्ट्स स्पिरिट जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा असा माणूस घडतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 



पंतप्रधान म्हणाले की टोकियोला जाणाऱ्या ऑलिम्पिक संघात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणा देणारं आहे. प्रवीण जाधवचं मोदींनी कौतुक केलं. प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गावचा आहे. तो उत्तम तिरंदाजी करणारा खेळाडू आहे. त्याचे पालक कुटुंब चालविण्यासाठी मजुरीचं काम करतात आणि आता त्यांचा मुलगा टोकियोला पहिला ऑलिम्पिक खेळण्यासाठी जात आहे. केवळ त्याच्या पालकांनाच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे.



देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस व्हायरसचा धोका वाढला आहे. पंतप्रधानांनी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासंबंधी सूचना केल्या.


डेल्टा प्लस व्हेरियंटची पंतप्रधानांनी माहिती घेतली.लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेऊ नका असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं आहे. तर ऑलिम्पिकला जाणा-या खेळाडूंवर दडपण नको, प्रोत्साहन द्या असंही मोदी म्हणाले आहेत. त्यांनी यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा प्रेरित करणारा प्रवासही सांगितला.