भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे - पंतप्रधान मोदी
पद्म पुरस्कारांची प्रक्रिया आता अधिक योग्य आणि पारदर्शक झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. 2018 वर्षातील पहिली आणि चाळीसाव्या `मन की बात` कार्यक्रमातून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.
नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांची प्रक्रिया आता अधिक योग्य आणि पारदर्शक झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. 2018 वर्षातील पहिली आणि चाळीसाव्या 'मन की बात' कार्यक्रमातून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.
यावेळी दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांबाबत भूमिका मांडली. पद्म पुरस्कारांची प्रक्रिया आता ऑनलाईन झाली असल्याने त्यात अधिक पारदर्शकता आल्याचे मोदींनी म्हटलंय.
मन की बातमध्ये मोदींनी महिला सक्षमीकरणाचंही कौतुक केलंय. मुंबईतल्या मांटुगा रेल्वे स्थानकावर सर्व महिला कर्मचारी असल्याचा मोदींनी खास उल्लेख केलाय. हुंड्याची कुप्रथा रोखण्यासाठी नितीश कुमार यांच्या बिहार सरकारने घेतलेल्या निर्णयाचीही मोदींनी स्तुती केलीय.