पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकृष्ण आडवाणींच्या निवासस्थानी
लालकृष्ण अडवाणी आज (रविवारी) ९३ वर्षांचे झाले.
नवी दिल्ली : आज भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lalkrishn Aadwani) यांचा वाढदिवस आहे. लालकृष्ण अडवाणी आज (रविवारी) ९३ वर्षांचे झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांसह गृहराज्यमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J.P.Nadda) होते.
लालकृष्ण आडवाणी हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी आहेत. ज्यांनी अनेक दशकं भाजपाला सक्षम बनविण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांनी राम मंदिर चळवळीचे नेतृत्व केले आणि राम मंदिराचे बांधकाम पाहिले.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म कराची (आताचा पाकिस्तान) मध्ये १९२७ मध्ये झाला . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. अडवाणी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहीले आहेत.
अडवाणी हे १९९७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होते. यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये दोनदा गृहमंत्री (१९९८-९९, १९९९-२००४) आणि उपपंतप्रधान (२००२ ते २००४) राहीले आहेत. बाबरी मशिद प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.