नवी दिल्ली : शेअर मार्केटमधील दिग्गज भारतीय गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पीएम मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. मोदी यांनी झुनझुनवाला यांना 'वन ऍंड ओन्ली' असे संबोधले. राकेश झुनझुनवाला भारतीय बाजार आणि अर्थव्यवस्तेबाबत जबरदस्त पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी रिटेल गुंतवणूकदारांना भारतीय बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम मोदी यांचे ट्वीट
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटरवर म्हटले की, वन ऍंड ओन्ली राकेश झुनझुनवालांना भेटून आनंद झाला. 



याआधी पंतप्रधान मोदी यांची QS Quacquarelli Symonds Ltd चे एमडी नुंजियो क्वाकेरेली (Nunzio Quacquarelli)शी भेट झाली. क्वाकेरेली यांनी पंतप्रधानांसोबत शिक्षण क्षेत्राविषयी चर्चा केली.


नुकतेच राकेश झुनझुनवाला यांनी म्हटले होते की, रिटेल गुंतवणूकदारांनी चांगल्या परताव्यासाठी भारतात गुंतवणूक करायला हवी. झुनझुनवाला देशातील निवडक दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते. झुनझुनवाला Rare Enterprises या आपल्या कंपनीच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करतात. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 38 पेक्षा अधिक शेअर्स आहेत. तर एकूण नेटवर्थ 22 हजार 900 कोटी रुपयांचा आहे.


pm narendra modi meets top share market investor rakesh jhunjhunwala says very bullish about the indian economy