Narendra Modi Personal Diary : पंतप्रधान मोदी हे नेहमी देशाला संबोधित करताना इतिहासाची उजळणी करतात. नव्या पिढीला देशवासियांना आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देत असतात असं म्हटले जाते.  पंतप्रधान मोदी अनेक कार्यक्रमांतून देशाचे दर्शन घडवतात. याशिवाय मन की बातमध्येही अनेकदा देशाची संस्कृती, गौरवशाली परंपरा, तत्त्वज्ञान आणि जागतिक बंधुत्वाबद्दल बोलतात. पण तुम्हाला माहीत आहे का नरेंद्र मोदी आजपासून 20-25 वर्षांपूर्वी देशाबद्दल काय विचार करायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डायरीचे एक पान सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी देशाविषयी आपले मत मांडले आहेत. डायरीत त्यांनी काही संस्कृत स्तोत्रे लिहिली आहेत जी आजही ते त्यांच्या भाषणात वापरतात...  ( pm narendra modi old dairy page viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायरीत काय लिहिलं होतं?


नरेंद्र मोदींनी ही डायरी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नसताना लिहिली होती. त्यावेळी ते भाजपचे एक सामान्य कार्यकर्ते होते. डायरीमध्ये त्यांनी भारताची गौरवशाली परंपरा, तत्त्वज्ञान, जागतिक बंधुता आणि जागतिक कल्याणाच्या भावनेचे वर्णन करणारी संस्कृत स्तोत्रे लिहिली आहेत. असे डायरीत लिहिले आहे


विविधतेत एकता आहे.


कार्य संस्कृति- त्येन त्यक्तेन भूंजिथा:


कार्यशैली- सहनाववतु। सह नौ भुनक्तु। (देव आपल्या सर्वांचं रक्षण करो)


राष्ट्रीय आकांक्षा- राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम। ( मी माझं आयुष्य देशसेवेत अर्पण करतोय)


Global Vision- वसुधैव कुटुंबकम् (हे विश्वची माझे घर)


चरैवेति चरैवेति - नव्या विचारांचा कल्पनांचा स्विकार करा


सर्वे अपि सुखिनः सन्तु - संपूर्ण जग सुखी राहो


न कामये राज्यम्, न स्वर्गम्, न पुनर्भवम् - मला राजा व्हायचं नाही, मला स्वर्ग नकोय, मला पुर्नजन्म नकोय.


वंदे मातरम


देशातील जनताच माझी शक्ती आहे. त्यांच्यामुळेच माझी उर्जा आहे. 


वाचा : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा फटका, जाणून घ्या आता काय महागले?  


हे पत्र कुठून आले?


डायरीचे हे जुने पान मोदींच्या वाढदिवसाच्या काही दिवसांनी 'मोदी आर्काइव्ह' नावाच्या सत्यापित ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले. अनेकदा या हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुनी छायाचित्रे, पत्रे, जुने व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग तसेच त्यांच्याशी संबंधित वर्तमानपत्रांच्या जुन्या क्लिपिंग शेअर केल्या जातात.


हे पत्र कधीचं असू शकतं?


या डायरीत नरेंद्र मोदींनी भारताच्या 100 कोटी लोकसंख्येचा उल्लेख एका ठिकाणी केला आहे. यावरून असा अंदाज लावता येतो की त्यांनी या गोष्टी 1990 च्या उत्तरार्धात किंवा 2000 च्या सुरुवातीला लिहिल्या असाव्यात. याचे कारण म्हणजे 2001 च्या जनगणनेत भारताची लोकसंख्या प्रथमच 100 कोटींच्या पुढे गेली. पण, ती जनगणना प्रसिद्ध होण्यापूर्वीच देशाची लोकसंख्या 100 कोटींच्या जवळपास पोहोचल्याचा अंदाज होता. नरेंद्र मोदी ऑक्टोबर 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले, म्हणजेच डायरीची ही नोंद 1990 ते ऑक्टोबर 2001 पर्यंतची असू शकते.