COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर रवाना होतायत. आज पासून काठमांडूत बिम्सेटक परिषदेला सुरूवात होतेय. या परिषदेला बंगालच्या उपसागराशी निगडीत दक्षिण आशियातील देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. त्यात भारत,नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतान या देशांचा समावेश आहे. या दौऱ्यावर जाण्याआधी शेजारी राष्ट्रांशी संबंध दृढ होण्यासाठी परिषदेचा मोठा हातभार लागेल अशी आशा व्यक्त केलीय.


आर्थिक संबंधांना बळकटी


या परिषदेत प्रमुख्यानं आपआपसतल्या सुरक्षा आणि दहशतवाद मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे एकमेकांच्या देशात ये-जा करण्यासाठी लागू असेलल्या नियमांमध्ये शिथीलता आणण्याचेही प्रयत्न करण्यात येणार आहेत. आर्थिक संबंधांना बळकटी देण्याचाही परिषदेत प्रयत्न होणार आहे. 
काठमांडू दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी पशुपती नाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्याचप्रमाणे मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली एकत्रित पणे भारत-नेपाळ मैत्री धर्मशाळेचंही उद्घाटन करणार आहेत.