नवी दिल्ली: डिस्कव्हरी चॅनेलवरून नुकत्याच प्रसारित झालेल्या Man Vs Wild कार्यक्रमासंदर्भात एक रंजक गोष्ट समोर आली आहे. Man Vs Wild च्या १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या भागात बेअर ग्रिल्ससोबत नरेंद्र मोदीही दिसले होते. त्यामुळे सोशल मीडियावर या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात मोदी अनकेदा बेअर ग्रिल्सशी हिंदीत बोलताना दिसत होते. त्यामुळे मोदी हिंदी भाषेत काय बोलतात, हे बेअर ग्रिल्सला कसे समजत होते, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. याचा उलगडा आज मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमात केला. 


'वाघ आला तर भाल्याने मारा', सांगणाऱ्या बेअर ग्रिल्सला मोदींनी दिले 'हे' उत्तर


यावेळी मोदींनी म्हटले की, अनेक लोकांना बेअर ग्रिल्सला मी हिंदीत काय बोलत होतो, हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. काहींनी तर हे शॉटस् एडिट किंवा अनेकवेळा चित्रीत केल्याचा तर्क लावला होता. प्रत्यक्षात मात्र यावेळी तंत्रज्ञान कामाला आले. हे तंत्रज्ञान बेअर ग्रिल्स आणि माझ्यातील दुवा होता. बेअर ग्रिल्सच्या कानात एक वायरलेस उपकरण लावण्यात आले होते. त्यामध्ये मी हिंदीत बोलत असलेले शब्द इंग्रजीत भाषांतरित केले जात होते. त्यामुळे बेअर ग्रिल्सला मी काय बोलतो, हे कळत असल्याचा खुलासा यावेळी मोदींनी केला. 


मोदींचा 'Man Vs Wild' अंदाज पाहून नेटकऱ्यांची मीम एक्स्प्रेस सुस्साट