मोदींचं `फेटा`प्रेम! पाच प्रजासत्ताक दिनाचे पंतप्रधानांचे पाच फेटे
देशभरामध्ये ७०वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय.
नवी दिल्ली : देशभरामध्ये ७०वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आलेले प्रमुख पाहुणे सिरील रामाफोसा यांच्या उपस्थितीत संचलन मोठ्या दिमाखात पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या प्रजासत्ताक दिनी त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत होते. मोदी कु्र्ता आधीच लोकांमध्ये लोकप्रिय झाला होता. यानंतर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला मोदींनी घातलेले फेटे नेहमीच चर्चेत राहिले. पंतप्रधान मोदींचा या कार्यकाळातला हा शेवटचा प्रजासत्ताक दिन होता. यावेळी मोदींनी केशरी रंगाचा फेटा घातला होता.
पारंपरिक कुर्ता पायजमा आणि नेहरु जॅकेट घालून मोदी आले होते. गणतंत्र दिवसाच्या परेडला जाण्याआधी मोदींनी 'अमर जवान ज्योती'वर जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
२६ जानेवारी २०१८
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१८ सालच्या प्रजासत्ताक दिनाला घातलेल्या फेट्याचा रंग पिवळा, लाल आणि हिरवा होता. या समारोहाला आसियानच्या दहा देशांचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.
२६ जानेवारी २०१७
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१७ च्या परेड दरम्यान गुलाबी रंगाचा फेटा घातला होता. या समारोहाला अबूधाबीचे प्रिन्स जनरल शेख मोहम्मद प्रमुख पाहुणे होते.
२६ जानेवारी २०१६
२०१६ साली पंतप्रधानांनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सिसो ओलांद या समारोहात प्रमुख पाहुणे होते.
२६ जानेवारी २०१५
२०१५ सालच्या प्रजासत्ताक दिनाला मोदींनी लाल आणि हिरव्या रंगाचा जयपुरी फेटा घातला होता. या सोहळ्याला अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती बराक ओबामा प्रमुख पाहुणे होते.
नरेंद्र मोदींनी २०१४ सालच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून त्यांचं पहिलं भाषण केलं होतं. यावेळी मोदींनी लाल रंगाचा जोधपुरी फेटा बांधला होता. हा फेटा कच्छवरून मागवण्यात आला होता. आत्तापर्यंतच्या प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनी मोदी वेगवेगळ्या रंगीबेरंगी फेट्यांमध्ये पाहायला मिळाले.