नवी दिल्ली : आज गुरुवारी २०१९ या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण (Solar Eclipse) पाहण्यात आलं. हे सूर्यग्रहण भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिसलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) सूर्यग्रहण पाहिलं. परंतु दिल्लीतील ढगाळ वातावरणामुळे पंतप्रधानांना थेट सूर्यग्रहण पाहता आलं नाही. त्यांनी कोझीकोड (Kozhikode)आणि इतर शहरांत दिसलेलं सूर्यग्रहण लाईव्ह स्ट्रीमद्वारे पाहिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत पंतप्रधानांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे. 'इतर भारतीयांप्रमाणे मीदेखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. परंतु ढगाळ वातावरणामुळे मी थेट सूर्यग्रहण पाहू शकलो नाही. लाईव्ह स्ट्रीमद्वारे सूर्यग्रहण पाहिलं. त्यासोबतच तज्ञांसोबत याविषयी अधिक माहिती घेत चर्चा केली' असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.



गुरुवारी २०१९ या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागलं. या सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर' नाव देण्यात आलं. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी सूर्यग्रहण दिसलं. सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी सुरु झालेलं सूर्यग्रहण ११ वाजून १४ मिनिटांपर्यंत होतं. 


खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला 'फायर रिंग' असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते.


ग्रहणाविषयी गैरसमज


आपल्याकडे ग्रहणाविषयी अनेक गैरसमज आहेत. ग्रहण पाहू नये, ग्रहणात जेवू नये, ग्रहणकालात झोपू नये, ग्रहणकालात झोपू नये असे समजले जाते त्यात काहीही तथ्य नसल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ग्रहणे हा नैसर्गिक अविष्कार आहे. सावल्यांचा खेळ आहे. ग्रहणे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घेतले पाहिजे.