मोदींच्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधींचा हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात एक चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळालं.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात एक चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळालं.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
ग्राहकांच्या संरक्षणासाठी नवा कायदा करणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल केल्यास विशिष्ट कालावधीत कारवाई करण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात येणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं.
जीएसटीमुळं केंद्र आणि राज्यांच्या कर संकलनाचा गोंधळ मिटला असून ग्राहकांचाही फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
तर दुसरीकडं राहुल गांधींनी मात्र जीएसटी आणि नोटाबंदीवरून मोदी सरकारवर पुन्हा हल्ला चढवला. जीएसटी आणि नोटाबंदीच्या माध्यमातून मोदी सरकारनं अर्थव्यवस्थेवर दुहेरी घाला घातल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, उद्योग आणि व्यवसाय डबघाईला आलेले असताना अर्थमंत्री मात्र, माध्यमांसमोर जाऊन सारं काही सुरळीत असल्याचं सांगतात, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी अरुण जेटलींची खिल्ली उडवली.
दिल्लीत पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सदस्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी ही टीका केली.