नवी दिल्ली : गाडीच्या छतावरची लाल बत्ती गूल करून व्हिआयपी कल्चरला लगम घातल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना आणखी एक तंबी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना इशारा देत मोदींनी म्हटले आहे की, दौऱ्यादरम्यान पंचतारांकीत सेवांचा लाभ न घेता सर्वाजनिक सेवा आणि सुविधांचाच लाभ घ्या. महागड्या हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी साधेपणाने राहा. बुधवारी (१६ ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी विशेष मुद्दा उपस्थित करून सहकारी मंत्र्यांना हा इशारा दिला. पंतप्रधान मोदी हे आपल्या सहकाऱ्यांच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्काम ठोकण्याच्या सवयीमुळे नाराज आहेत. या बैठकीत त्यांनी थेटच सांगितले की, दौऱ्यांदरम्यान, पंचतारांकीत हॉटेलमध्य मुक्काम करू नका. त्याऐवजी सरकारी विश्रामगृहांचा वापर करा.


मंत्र्यांना अवाहन करताना मोदी म्हणाले की, मी याबाबतही गंभीर आहे की, काही लोकांविरूद्ध रिपोर्ट योतो आहे की, ते आपल्या मंत्रालयात पीएसयू वाल्या गाड्यांचाही वापर करतात. मी स्पष्टपणे सांगतो की, यापूढे कोणताही मंत्री किंवा त्याच्या परिवारातील व्यक्तींकडून झालेला कोणत्याही स्वरूपाचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही.