नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेऊ यांना आज राष्ट्रपती भवनात गॉर्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याआधी जस्टीन ट्रुडेऊ, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं.त्यानंतर जस्टीन यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज भारत आणि कॅनडा दरम्यान हैदराबाद हाऊसमध्ये महत्त्वाचे करार होणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेऊ , त्यांची पत्नी सोफिया, मुलं झेवियर, इला आणि हरिदेन या सगळ्यांसह  गेल्या आठवडाभरापासून भारताच्या दौ-यावर आहेत. त्यांनी आतापर्यंत आग्र्याच्या ताजमहालासह विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्यायत. राजघाटावर जाऊन त्यांनी गांधीजींच्या स्मृतींना आदरांजलीही वाहिली.


जस्टीन ट्रुडेऊ यांचं अख्खं कुटुंब भारताच्या दौ-यात भारतीय पेहरावातही वावरताना दिसलं. जस्टीन यांचं कुटुंब भारतात विविध भागांत फिरुन तिथली संस्कृतीही जाणून घेतंय.  विशेषतः जस्टीन ट्रुडेऊ यांचा सगळ्यात धाकटा मुलगा या सगळ्या सहलीत प्रचंड धमाल करताना दिसतोय. त्याचं बागडणं, त्याच्या खोड्यांचे व्हिडीओ सध्या ट्रेण्डिंग आहेत.