नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. ते आज गुटूंर येथे रॅली करणार आहेत. सत्ताधारी तेलंगणा देशम पार्टीने भाजपा सोबत गठबंधन तोडल्यानंतर पंतप्रधानांची ही पहीली रॅली असणार आहे. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या पार्टी कार्यकर्त्यांना रविवारी पूर्ण राज्यभरात विरोध प्रदर्शन करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान मोदी या ठिकाणी एका सभेला संबोधित करणार असून याव्यतिरिक्त पेट्रोलियम आणि गॅस संबंधित 6,825 कोटी रुपयांच्या दोन योजनांचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान रिमोट कंट्रोलने नल्लोर जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉरर्पोरेशन लिमिटेडच्या एका टर्मिनलचे भूमीपूजन करणार असल्याचे भाजपा खासदार जीवी एल नरसिंह राव यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान विरोधात रस्त्यावर होणाऱ्या आंदोलनाकडे देशाचे लक्ष जाईल यासाठी चंद्रबाबू यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यांनी टेलीकॉन्फरन्स कॉल करुन कार्यकर्ता आणि पार्टी सदस्यांना आवाहन केले. केंद्राने राज्यासोबत विश्वासघात केल्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन व्हायला हवे आणि संपूर्ण देशाचे लक्ष याकडे यावे असेही त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना सांगितले. 



टीडीपी प्रमुख सोमवारी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान विरोधी आंदोलन सुरू ठेवणार आहेत. महात्मा गांधी यांनी दाखवलेला मार्ग अवलंबूनच आम्ही विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  2014 मध्ये राज्याच्या विभाजनानंतर झालेली बरबादी पाहण्यासाठी मोदी येत असल्याचा आरोप नायडू यांनी केला. लोक अजून जिवंत आहेत का ? हे बघण्यासाठी ते येत आहेत का ? असा तिखट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही चंद्रबाबू यांनी केला आहे.