लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या लोकसभा मतदार संघ वाराणसीला भेट देणार आहेत. देव दिपावलीच्या मुहूर्तावर मोदी वाराणसीमध्ये दाखल होणार आहेत. शिवाय याठिकाणी लेझर शो देखील पाहणार आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील असणार आहे. देव दिपावलीच्या मुहूर्तावर वाराणसी घाट लाखो दिव्यांनी उजळून निघणार आहे. देव दिपावलीच्या मुहूर्तावर वाराणसी घाट १५ लाख दिव्यानी झळकणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी सोमवारी दुपारी २.१० वाजता बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते लष्करी हेलिकॉप्टरने खजुरी जनसभा स्थळावर पोहोचतील. त्याठिकाणी ते प्रयागराज - वाराणसी सिक्सलेन प्रकल्पाचं उद्घाटन करून जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते राजघाटला देखील भेट देणार आहेत. 


ठरल्यानुसार ते क्रुझवरून राजघाटला येणार आहेत. त्यानंतर ५ वाजता दिवे लावून दिपोत्सवाची सुरूवात करणार आहेत. त्यानंतर परिसरात १५ लाख दिवे लावण्यात येणार आहेत. वारणसी दौऱ्यादरम्यान ते रविदास घाटला देखील भेट देणार आहेत. त्यानंतर सारनाथ येथील लाईट ऍण्ड शो देखील पाहणार आहेत.