मुंबई : भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. अमित शाह यांचा 55 वा वाढदिवस असून भाजपाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी शुभेच्छा देत अमित शाह यांना कर्मठ, अनुभवी आणि कुशल संगठनकर्ता या विशेषणांनी संबोधलं आहे. त्यांच्या कौतुकाचे बोल या ट्विटमध्ये लिहिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


14 वर्षांचे असल्यापासून RSS सोबत नातं 


22 ऑक्टोबर 1964 साली जन्माला आलेले अमित शाह 14 वर्षांचे असल्यापासून RSS शी जोडलेले आहेत. त्यानंतर त्यांनी सियासी यात्रा पूर्ण केली. ऑगस्टमध्येच त्यांना भाजपा अध्यक्ष होऊन चार वर्षे पूर्ण झाले आहेत. 


2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या यशामध्ये अमित शाह यांचा महत्वाचा वाटा आहे. एवढंच नव्हे तर पंतप्रधान मोदींनी 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब अमित शाह यांना दिला. तसेच गेल्यावर्षी 2018 च्या ऑगस्टमध्ये अमित शाह राज्यसभेचे सदस्य झाले. तर 2019 लोकसभा निवडणुकीत अमित शाह गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडणून आले आणि खासदार झाले.


भाजपाचे 'चाणक्य' 


 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड मतांनी निवडून येण्यात अमित शाह यांची खूप महत्वाची भूमिका होती. त्यांना 'चाणक्य' म्हणून संबोधण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातमधील प्रचाराची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली आणि अनेक सभा घेतल्या. राजकीय तज्ञ म्हणतात की, भाजपाला 'अच्छे दिन' आले पण अमित शाह मात्र हे मान्य करत नाही. त्यांच्यामते 'अच्छे दिन' यायला अद्याप बराच काळ आहे.