Prahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
PM Modi Brother Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोला येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. यावेळी कारमध्ये प्रल्हाद मोदी यांचा मुलगा आणि सूनही गाडीत होते. दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जेएसएस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (PM Narendra Modis brother Prahlad Modi family injured in accident near Mysore latest marathi news)
प्रल्हाद मोदी त्यांच्या मुलगा आणि सूनेसह सहलीला निघाले असल्याची माहिती समजत आहे. मात्र दुभाजकाला कार धडकल्याने अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. अपघातानंतर कारचा व्हिडीओ समोर आला आहे. मोदींच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसत आहे. दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाल्याचं दिसत आहे.
प्रल्हाद मोदी याआधीही अनेकवेळा चर्चेत आले आहेत. प्रल्हाद मोदी हे राशनचे दुकान चालवत असून अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या जंतरमंतर येथील आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी, माझा भाऊ पंतप्रधान असला म्हणून काय झालं? मी काय उपाशी मरू काय? असा सवाल प्रल्हाद मोदींनी केला होता.