नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ६ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा जनतेला संबोधित केलं आहे. कोरोना व्हायरस अजून गेला नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी करणं योग्य नाही, असं सांगत पंतप्रधानांनी आज भाषणाला सुरूवात केली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन गेलं असेल तरी कोरोना व्हायरस गेलेला नाही. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. 
आपल्याला परिस्थिती सुधारायची आहे, बिघडवायची नाही.



आज देशात रिकव्हरी रेट चांगला आहे. भारतात प्रती 10 लाख लोकसंख्येत जवळपास साडे पाच हजार लोकांना कोरोना झाला आहे. अमेरिकेत हा आकडा २५ हजार आहे.
१० लाख लोकसंख्येत जवळपास मृत्यूदर हा ८३ आहे. तर अमेरिकेत हा आकडा ६०० च्या पार आहे.
आपल्याकडे १२ हजार काॅरन्टाईन सेंटर्स आहेत.
२ हजार लॅब टेस्टिंग लॅब आहेत.



टेस्टची वाढणारी संख्या ही ताकद आहे
बेफिकीर होण्याची ही वेळ नाही, काळजी घेण्याची गरज आहे. 



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी संत कबीर यांच्या दोह्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की....


पकी खेती देखिके, गरब किया किसान।
अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान।


याचा अर्थ आपण बेफिकीर राहू नये. कोरोना संपल्याचे समजू नये. आपल्याला लस येईपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यावर ती प्रत्येकाकडे पोहोचवण्याचा विचार केला जाईल. त्यामुळे आपली काळजी घ्या.