पोपट पिटेकर, झी मीडिया,मुंबई : केंद्र सरकार (Central Govt) नेहमीच उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असते. अनेक लोकांना व्यवसाय करायचा असतो. परंतू पैशा अभावी अनेकांना व्यवसाय करता येत नाही. आता मात्र केंद्र सरकारच्या योजनेमुळे (Central Government Scheme) अनेकांना व्यवसाय करण्यासाठी सरकार भांडवल उपलब्ध करुन देणार आहे. काय आहे सरकारची योजना चला पाहूयात..


प्रधानमंत्री स्वानिधी योजना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरिबांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदी सरकार प्रधानमंत्री स्वानिधी योजना (PM Street Vendor's AtmaNirbhar Nidhi) अंतर्गत गरीब लोकांसाठी अनेक योजना राबवत आहे. पीएम स्वानिधी योजना देखील त्यापैकी एक आहे. ही योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) अंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. गरीब लोकांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष माइक्रो-क्रेडिट सुविधा (Micro-credit facility) योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली.


रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी योजना


प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत (PM Svanidhi Yojana) रस्त्यावरील विक्रेत्यांचा समावेश केला जाणार आहे. ज्यांना कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला होता. सहसा, रस्त्यावर विक्रेत्यांवर काम करणारे लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज कमाई करतात. अशी बचत फारशी होत नाही. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाल्यानंतर अशा लोकांना मोठा फटका बसला. अशा लोकांच्या उद्धारासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्वानिधी योजना ( (PM Svanidhi Yojana)  सुरू केली. याचा लाभ रस्त्यावरील विक्रेत्यांना घेता येणार आहे.


हमीशिवाय कर्ज


स्वानिधी योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना (street vendors) हमीशिवाय कर्ज दिले जाणार आहे. (Loan without guarantee) यामध्ये त्यांना 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. ते कोणत्याही हमीशिवाय दिले जाते. हे कर्ज त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी दिले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे रस्त्यावरील विक्रेते हे कर्ज पुन्हा पुन्हा घेऊ शकतात.


कर्ज कसे मिळवायचे


स्वानिधी योजनेंतर्गत प्रथमच 10 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध आहे. (How to get a loan) कर्ज घेतल्यानंतर वर्षभरात त्याची परतफेड करता येते. तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी रक्कम भरून पैसे परतफेड करु शकता. मात्र, त्यात 20 हजार रुपये आणि 50 हजारांपर्यंतच्या कर्जाचाही पर्याय आहे.


सरकरी बँकेकडे करा अर्ज


प्रधानमंत्री स्वानिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारी बँकेत जावे लागेल. (Government Bank only application) बँकेत जाऊन पीएम स्वानिधी योजनेचा फॉर्म भरुन आधार कार्डसह अर्ज जमा करा. त्यानंतर बँक तुमचं लोन (bank loan) मंजूर करते. त्यांनतर पैसे हे हप्त्यात मिळतात.