दिवाळीत पंतप्रधानांची जवानांना खास भेट
बोफोर्सनंतर तब्बल ३१ वर्षांनी...
नाशिक : यंदाच्या दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सेनेच्या जवानांना एक खास भेट देणार आहेत. आर्टिलरीची मारक क्षमता वाढवण्यासाठी भारतीय सेनेला तीन एम-७७७ अल्ट्रालाईट होवित्झर तोफ आणि तीन के-९ ही बख्तरबंद तोफ सोपवण्यात येणार आहे.
येत्या ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील देवळालीमध्ये होणाऱ्या या भव्य समारंभात संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
बोफोर्सनंतर तब्बल ३१ वर्षांनी भारतीय सेनेला ही पहिली तोफ मिळेल. के-९ वज्र ही तोफ दक्षिण कोरियाची कंपनी 'हनवहा टेक विन'नं मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलीय. भारतात या तोफेचं निर्माण 'एल एन्ड टी' करणार आहे.
२०२० पर्यंत के-९ वज्र आर्टिलरीच्या १०० तोफा भारतीय सेनेकडे असतील. हा एकूण ४५०० करोड रुपयांचा प्रोजेक्ट आहे... यातील १० तोफा तयार मिळतील. तर ९० तोफांची निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत केली जाईल.