नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झारखंडला पंतप्रधान जन आरोग्य PM-JAY योजनेची सुरूवात केली आहे. आयुष्मान भारत योजनेचं नाव बदलून पंतप्रधान जन आरोग्य अभियान PM-JAY नाव देण्यात आलं आहे. PM-JAY योजनेनुसार प्रत्येक परिवाराला दरवर्षी उपचारासाठी ५ लाख रूपयांचं विमा सुरक्षा मिळणार आहे. या योजनेतून १० कोटी परिवारांतील ५० कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. पंतप्रधान जन आरोग्य योजना, राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक विमा योजनेची जागा घेणार आहे.


कसा मिळेल PMJAY चा लाभ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार किंवा नाही, याचा तपास घेणे अगदी सोपे आहे. खालील माहितीच्या आधारावरून तुम्हाला सांगता येणार आहे की, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा नाही, किंवा तुमचं नाव या यादीत आहे किंवा नाही.


पंतप्रधान जन आरोग्य योजना PMJAY


पंतप्रधान जन आरोग्य योजनेची लाभार्थ्यांची यादी शोधण्यासाठी तुम्हाला mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. येथे मोबाईल नंबरवाल्या फॉर्मवर तुमचा नंबर लिहा. खाली  दिलेल्या फॉर्मवर वर दिलेला कॅप्चा लिहा. 


खाली ओटीपी, म्हणजेच वन टाईम पासवर्डच्या बटनवर क्लिक करा. ओटीपी टाकल्यानंतर दुसरं पान उघडेल. येथे आपलं राज्य महाराष्ट्र निवडा. मग खाली तुमचं नाव, रेशनिंग कार्ड नंबर, मोबाईल नंबर, RSBY URN निवडा आणि त्याचं डिटेल्स लिहा.


पंतप्रधान जन आरोग्य योजनेत काय आहे खास PMJAY


देशातील कोणत्याही खासगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करा.
सर्व राज्यातील सरकारी हॉस्पिटल या योजनेचा लाभ देतील.
या योजनेतील लाभ, तर उपचारानंतर विमा कंपनीकडून हॉस्पिटलला बिल चुकवण्याचं काम आयुष्मान मित्र पाहतील.
विमा कव्हरसाठी वयाची कोणतीही अट नसेल.
यात सर्व प्रकारचे आजारांवर उपचार केले जातील.
ही योजना कॅशलेस आहे, यात परिवारातील सदस्यांची संख्या आणि अटीचा समावेश नाही.