PM Jeevan Jyoti Bima Yojana/ PM Suraksha Beema Yojana: एकिकडे सर्वच गोष्टींचे दर वाढत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांच्या आयुष्यावरही याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. (Government Schemes) सरकारी योजनांचंही गणित सध्या याच पठडीत येताना दिसत आहे. तुम्हीसुद्धा जर अशा कोणत्या योजनेमध्ये पैसे गुंतवले असतील, तर ही बातमी व्यवस्थित वाचा. कारण, सरकारकडून तब्बल 7 वर्षांनंतर पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) यांमध्ये अंशत: बदल केले आहेत. हे बदल योजनांमधील प्रिमीयममध्ये करण्यात आलेल्या वाढीच्या रुपात पाहायला मिळत आहेत. सदर योजनांमध्ये प्रती प्रिमियम 1.25 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. (PMJJBY pm jeevan jyoti bima yojana and pm suraksha bima yojana primium increased know detailed rates)


तुम्हाला यापुढे किती पैसे भरावे लागणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हीही वरीलपैकी कोणत्याही योजनेच पैसे गुंतवले आहेत, तर तुम्हाला आता जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. यासाठी तुमच्याकडे सरकारी बँकेतील खातं असणं गरजेचं असेल. महत्त्वाची बाब अशी, की या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक (investment) करण्याची किंमत अतिशय कमी आहे. 


हेसुद्धा वाचा : Home Loan सुरु असताना पर्सनल लोन हवं आहे! जाणून घ्या मिळणार की नाही


यापूर्वी या योजनेमध्ये 342 रुपये गुंतवले जात होते. पण, आता मात्र सरकारनंच प्रिमियम वाढवलं आहे. त्यामुळं आता ही रक्कम जोडून वर्षभरात तुम्हाला 456 रुपये भरावे लागणार आहेत. या योजनांमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक अतिशय कमी असली तरीही त्याचे फायदे मात्र मोठे आहेत. 


पंतप्रधान जीवन ज्योती योजना 


- या योजनेअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी असणाऱ्या व्यक्तिला 2 लाख रुपयांचा परतावा मिळतो. 
- 18 ते 50 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. 
- यामध्ये तुम्ही 436 रुपये इतकी प्रिमियमची रक्कम भरणं अपेक्षित आहे. 
- ही एक टर्म इंन्श्युरन्स पॉलिसी आहे. 
- वर्षभरासाठी ही योजना लागू असते. 


पंतप्रधान सुरक्षा योजना 


- यामध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा परतावा मिळतो. 
- या योजनेअंतर्गत विमा धारकाला आंशिक अपंगत्व आल्यास त्यांना 1 लाख रुपयांची रक्कम मिळते. 
- 18 ते 70 वर्षांमधील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. 
- सदर योजनेचा वार्षिक प्रिमियम 20 रुपये इतका आहे.