Pensioners : पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी
निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी पेन्शन कायम ठेवणयासाठी खातं असलेल्या बँकेत आपण जिवंत आहोत याचा पुरावा म्हणून लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करावं लागतं.
मुंबई : निवृत्तीवेतनधारकांसाठी (Pensioners) अतिशय आनंदाची बातमी (Good News) समोर आली आहे. पेन्शन कायम ठेवणयासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी खातं असलेल्या बँकेत आपण जिवंत आहोत याचा पुरावा म्हणून लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करावं लागतं. यंदा हे लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची 30 नोव्हेंबर 2022 ही शेवटची तारीख आहे. याआधी पंजाब नॅशनल या सरकारी बँकेने (Punjab National Bank) मोठा निर्णय घेतला आहे. (pnb punjab national bank give facility to pensioners for submitting life certificate under to dore step banking know how to use this service)
पंजाब नॅशनल बँक पेन्शनर्सना डोरस्टेप बँकिगमार्फत घरबसल्या लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा देत आहे. बँकेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. निवृत्तीवेतनधारकांमध्ये अपवाद वगळता अनेकांना आजार असतात. तसेच ते ज्येष्ठ नागरिकही असतात. त्यामुळे त्यांना बँकेत येऊन सर्टिफिकेट जमा करणं जरा जिकरीचंच ठरतं. मात्र पीएनबीच्या यासेवेमुळे पेन्शनर्सची चिंता मिटलीय. बँकेच्या या सुविधेचा लाभ घेत आतापर्यंत एकूण 17 लाख 62 हजार डिजीटल स्वरुपातील लाईफ सर्टिफिकेट जमा झाले आहेत.
पेन्शनधारकांना या निर्णयाचा लाभ घ्यायचा असेल तर फ्री डोअरस्टेप बँकिग सेवेच्या 18001213721 / 18001037188 पर कॉल करा. तसेच psballiance.com करा. तसेच ऑनलाईन पद्धतीनेही लाईफ सर्टिफिकेट जमा करता येतं. त्यासाठी केंद्र सरकारच्या https://jeevanpramaan.gov.in/ या लिंकवर जाऊन तिथे हे लाइफ सर्टिफिकेट जमा करता येतं.