3350 फूट उंचीवर असलेला साताऱ्याचा थरारक सज्जनगड; अंगावर शहारे आणणार मशाल महोत्सव
Diwali 2024: साताऱ्याच्या सज्जनगड किल्ल्यावर मशला महोत्सव पार पडला. या मशाल महोत्सवाचे सुंदर फोटो.
Sajjangad Fort, Satara : महाराष्ट्रातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साश्रिदार आहेत. यापैकीच एक आहे तो 3350 फूट उंचीवर असलेला साताऱ्याचा थरारक सज्जनगड. दिवाळी निमित्ताने सज्जनगडावर मशाल महोत्सव पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड ही शिवशाहीची तर सज्जनगड ही अध्यात्मिक राजधानी मानली जात होती. समर्थ रामदास स्वामी यांनी सज्जनगड किल्ल्यावर समाधी घेतली. सातारा शहरापासून अवघ्या 9 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याला 750 पायऱ्या आहेत.