'इंटिमेट सीन्स कसे होते? किती वेळा Kiss केलास?',...जेव्हा निलमला आला पतीवर संशय, म्हणाली 'तू बिनधास्त...'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये निलम कोठारी आणि समीर सोनी यांचाही समावेश आहे. ही जोडी चाहत्यांना नेहमीच आदर्श नातं कसं असावं हे दाखवत असते.   

| Nov 01, 2024, 19:09 PM IST
1/10

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये निलम कोठारी आणि समीर सोनी यांचाही समावेश आहे. ही जोडी चाहत्यांना नेहमीच आदर्श नातं कसं असावं हे दाखवत असते.   

2/10

पण एकदा निलमला समीरला दुसऱ्या अभिनेत्रीसह रोमान्स करताना पाहून निलमला संशय आला होता.   

3/10

Gplus ला दिलेल्या मुलाखतीत निलमने सांगितलं की, कशाप्रकारे एका वेब शोसाठी समीरने तिच्याकडे परवानगी मागितली होती. यामध्ये समीरला सह-अभिनेत्रीला अनेकदा किस करायचं होतं.   

4/10

निर्मात्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली आहे. प्रत्येक सीनमध्ये मुलगा मुलीला किस करतो असं लिहिलं आहे. 1-2 ठीक आहे, पण प्रत्येक एपिसोडमध्ये किस सीन होता असं समीरने सांगितलं.   

5/10

"मी घरी येऊन निलमला स्क्रिप्ट दिली. जर तिला योग्य वाटत नसेल तर आपण शो करण्यास नकार देऊ शकतो असं सांगितलं. भविष्यात दुसरं काम मिळणार नाही असं तर नव्हतं"  

6/10

"निलमने मोठं मन दाखवत हा शो कर, तुझ्या करिअरसाठी चांगला आहे असं सांगितलं. फक्त मी हा शो पाहणार नाही एवढं म्हणाली"  

7/10

"पण काही दिवसातच निलमचं मत बदललं. तिच्या एका मैत्रिणीने हा शो पाहिल्यानंतर निलमला भडकावलं की तु असे सीन करण्यास परवानगी कशी काय देऊ शकतेस?"  

8/10

"मी शूट करुन घरी आल्यावर निलमने मला विचारलं, इंटिमेट सीन्स कसे होते? किती वेळा शूट झाले? हे सगळं ऐकून मी हैराण झालो," असं समीरने सांगितलं.   

9/10

"मी निलमला सांगितलं, मी तेच केलं जे दिग्दर्शकाने सांगितलं. पण निलम असं वागत असल्याने काहीतरी झालं आहे मला समजत होतं"  

10/10

या सगळ्यासाठी निलमची मैत्रीण जबाबदार होती. मी पत्नीला सांगितलं की, तूच या स्क्रिप्टसाठी होकार दिला होतास. आता मी निर्मात्याला नकार देऊ शकत नाही.