नवी दिल्ली : भजनपुरा येथे एकाच कुटुंबातील पाच जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा प्रमुख शंभूचा मामा प्रभू मिश्रा याने ही हत्या केली. पैशांच्या व्यवहाराबाबत कुटुंबात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ही घटना घडवून आणली. पोलिसांनी सांगितले, तपासणी दरम्यान प्रभूची हत्या एका नातेवाईकाने केली असल्याचे निदर्शनास आले. ३ रोजी प्रभूने शंभूला सांगितले की, लक्ष्मी नगरात पैशाबाबत बोलायचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंभू लक्ष्मी नगरला निघाला असतानाच प्रभू शंभूच्या घरी पोहोचला. तेथे पत्नी सुनीता ही एकटी होती जिच्याशी पैशाने भांडण झाले. शंभूने प्रथम सुनीताला लोखंडी रॉडने ठार केले. त्यानंतर मुलगी कोमल घरात आली असता तिलाही खोलीत बोलून तिची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलांची हत्या केली. 



घराबाहेर पडल्यावर शेजारी एका ठिकाणी प्रभू आणि शंभूने सोबत दारु ढोसली. दारु पिऊन झाल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्याने शंभूला मारले. हे सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. ३ तारखेला जेव्हा मुले शाळेत गेली नाहीत, त्यावेळी हे शाळेत समजले. त्यानंतर सीसीटीव्ही पाहिल्यानंतर या घटनेची माहिती उघड झाली. 


प्रभू याचे तीन तारखेला लोकेशन हत्या करण्यात आलेल्या घरात आढळून आले. भजनपुरा येथेही प्रभुचे लोकेशन सापडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रभू हा एका संस्थेत नोकरी आहे. आरोपी वय २८ वर्ष असून तो दूरच्या नात्यात मृत शंभूचा मामा असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारमधील सुपौलचा राहणारा असल्याची माहिती मिळत आहे.


ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात एका घरात पाच जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. ही घटना भजनपुराच्या मार्ग क्रमांक ११परिसरातील घडली होती.  पाच मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब एका घरात भाड्याने राहण्यास आले होते. नवरा बायको आणि तीन मुले असे हे कुटुंब होते. 


मृतांमध्ये नवरा शंभू कुमार (४५), त्यांची पत्नी सुनीता (३८), मुलगा शिवम (१८), मुलगा सचिन (१६) आणि मुलगी कोमल (१२) अशा पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे घराला बाहेरुन कुलूप लावलेले होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना पाच मृतदेह आढळले. पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, पैशाच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.