नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. कोरोना या धोकादायकमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. सामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण या युद्ध परिस्थितीत प्रत्येक जण माणुसकीची भावना मनात धरून चालत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांनी आपला मोर्चा आपल्या गावाकडे वळवला आहे. त्यापैकी एक म्हणजे सुमिन्दर वर्मा. दिल्लीत खाजगी नोकरी करणारा सुमिन्दर गेल्या दोन दिवसांपासून गावी जाण्यासाठी आणि आपल्या ३ वर्षाच्या आजारी मुलीला भेटण्यासाठी धडपड करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमिन्दर वर्मा हा मुळचा पंजाबमधील लुधियानाचा आहे. अचानक त्याची ३ वर्षांची मुलगी आजारी पडल्यामुळे त्याला तात्काळ गावी पोहोचणं भाग होतं. पण लॉकडाऊन असल्यामुळे त्याला मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दिसत नव्हाता. लॉकडाऊन असल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला कामावरून देखील काढून टाकले. अशा कठीण प्रसंगी त्याने गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. 


दोन दिसव रस्त्यावर चालल्यानंतर त्याने दिल्ली पोलिस  हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला आणि मदतीची विनंती केली. याच दरम्यान त्याचा संपर्क थेट अतिरिक्त आयुक्त मनदीप सिंह रंधावा यांच्यासह झाला. त्यानंतर रंधवा तात्काळ धकलेल्या बापाच्या मदतीसाठी धावून आले. 


याप्रकरणी त्यांनी पुढील सर्व जबाबदारी पोलिस निरिक्षक अनिल शर्मा यांच्याकडे सोपवली. तेव्हा शर्मा यांनी त्या सुमिन्दरचा फोन नंबर ट्रेसकरून लोकेशनची माहिती मिळवली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सुमिन्दरला गाडीत बसवले, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील अन्य दोन व्यक्तीही होते. अशा प्रकारे दिल्ली पोलिसांनी एक वडील आणि ३ वर्षाच्या मुलीची भेट घडवून आणली.