Atiq Ahmed Killing: गँगस्टर अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांनी पोलिसांच्या सुरक्षेत असतानाही गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर विशेष तपास पथक (SIT) तपास करत आहे. याचाच भाग म्हणून पोलिसांनी रुग्णालयाबाहेर संपूर्ण घटनाक्रमाचं नाट्य रुपांतर केलं आहे. पोलिसांनी यासाठी तिन्ही आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. आरोपींनी अतीक अहमद आणि त्याच्या भावाची पत्रकारांशी बोलताना गोळ्या झाडून हत्या केली होती. तिन्ही आरोपी पत्रकार असल्याचं भासवत तिथे पोहोचले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतीक अहमदने मृत्यूच्या काही सेकंद आधी कोणाला केला होता इशारा? व्हायरल होतोय हा Video


 


अतीक अहमद आणि त्याच्या भावाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं जात असताना आरोपींनी त्यांची हत्या केली होती. संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्याच्या उद्धेशाने पोलिसांनी तिन्ही आरोपींना घटनास्थळी नेत नेमकं काय झालं होतं याचं नाट्य रुपांतर केलं. 


नाट्य रुपांतरमध्ये काय दिसत आहे?


नाट्य रुपांतर केलं जात असताना पोलीस सुरक्षेत अतीक अहमद आणि अशरफ यांना रुग्णालयात नेताना दिसत आहेत. यावेळी आरोपी तेथून लांब उभे असतात. काही वेळाने दोन तरुण पत्रकारांच्या गर्दीतून पुढे येतात. यावेळी पोलीस त्यांच्या मागे उभे होते. यानंतर अचानक एकजण अतीक अहमदच्या डोक्यावर बंदूक ठेवत गोळी झाडतो. तर इतर दोघे अतीक अहमदच्या भावावर एकामागून एक अनेक वेळा गोळ्या झाडतात. अचानक गोळीबार सुरु झाल्याने पत्रकार आणि इतरजण तेथून पळ काढतात. यानंतर काही वेळातच पोलीस आरोपींना पकडतात आणि खाली जमिनीवर पाडतात. 



हे नाट्य रुपांतर पाहण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून नेमण्यात आलेली न्यायिक समितीही यावेळी हजर होती. 


तिन्ही आरोपींनी एकाच वेळी अतीक अहमदवर गोळीबार केला होता. यामुळे नेमकं त्यांच्याशी कोण संपर्क साधत होतं असा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी सिंग स्वत: आरोपी आणि माफिया सुंदर भाटी गँगच्या संपर्कात राहिला आहे. हमीरपूर जेलमध्ये सनी सिंग सुंदर भाटी गँगच्या संपर्कात आला होता. सनी सिंगनेच लवलेश तिवारी आणि अरुण मौर्य यांना हत्येत सहभागी करुन घेतलं. 


दरम्यान आरोपींनी 14 एप्रिललाही अतीक अहमदची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अतीकला कोर्टात नेलं जात असताना त्याला ठार करण्याची योजना होती. पण प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांनी माघार घेतली होती. प्रसिद्धीसाठी आपण अतीकची हत्या केल्याचा त्यांचा दावा आहे.