पंजाब : संपूर्ण देश सध्या कोरोना विषाणूच्या संकटाशी लढत आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या भारतात आली आहे, जी आधिच्या लोटेपेक्षाही अधिक भयानक आणि वेगाने पसरणारी आहे. या विषाणूला थांबवण्यासाठी आणि त्याची साखळी तोडण्यासाठी देशात अनेक निर्बंध लावले गेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लागू केले आहेत. या काळातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यामुळे बऱ्याच लोकांचे मनोरंजन होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही व्हिडीओ आपल्य़ाला आश्चर्यचकीत करणारे असतात. तसेच काही व्हिडीओ असे असतात ज्यातुन लोकांना शिकवण मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो लोकांची मने जिंकत आहे.


कोरोना संकटामुळे गर्दीकरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम करण्यास, सर्वत्र बंदी घालण्यात आली आहे. अशातच एक नवरदेव आपल्या नवरीला ज्या पद्धतीने घेऊन जात आहे, त्यामुळे त्याने पोलिसांची मनं जिंकली आहेत.


आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नवरा आणि नवरी दुचाकीवरून जात आहेत. अचानक पोलिस त्यांना रोखतात आणि प्रश्न करतात. त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी कोरोना काळात लग्न केले, त्यामुळे त्यांनी पोलिसांची मनेही जिंकली. पोलिसांनी त्यांना पुष्पहार घालून आणि आहेर देऊन दोघांनाही आशिर्वाद दिला.



व्हिडीओने हृदय जिंकले


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. हा व्हिडीओ भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीट करत शेअर केला आहे.
व्हिडीओ सामायिक करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, '#COVID प्रोटोकॉल फॉलो करत या जोडप्याने लग्न केले आणि दुचाकीवरून घरी जात आहेत." हा व्हिडीओ पंजाबचा असल्याचे सांगितले जात आहे. आता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकं हा व्हिडीओ पाहून खूप आनंद घेत आहेत.