...म्हणून आता जगही म्हणेल `अय्यो`!
दाक्षिणात्य वर्गाकडून रोजच्या बोलण्यात या शब्दाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
मुंबई : एखाद्या शब्दाचा वापर एकाएकी इतका वाढतो की तो शब्द मग बऱ्याच सीमा ओलांडतो. अशा शब्दांच्याच गर्दीत येणारा आणि अनेकदा वापरला जाणारा एक शब्द म्हणजे अय्यो. 'अय्या' या शब्दाच्याच वर्गातील हा 'अय्यो'. पण, तो म्हणताना त्याची लय मात्र थोडी वेगळीच असते.
दाक्षिणात्यांकडून मोठ्या प्रमाणावर या शब्दाचा वापर केला जातो.
कोणत्या धक्कादायक गोष्टीवर व्यक्त होण्यासाठी, आश्चर्यचकित भावना व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.
रोजच्या वापरात संभाषणातही या शब्दाचा बराच वापर पाहायला मिळतो. त्याचाच एकंदर अंदाज आणि व्याप्ती पाहता आता साऱ्या जगभरात हा अय्यो सर्वांच्या ओळखीचा होणार आहे.
सध्याच्या घडीला 'अय्यो'ची इतकी चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे हा प्रचलित शब्द आता थेट 'ऑक्सफर्ड इ्ंग्लिश डिक्शनरी'मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
विविध भावना व्यक्त करण्यासाठी 'अय्यो'चा वापर केला जणारा हा शब्द थेट जागतिक स्तरावर पोहोचल्यामुळे काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही एक पोस्ट केली आहे.
सोशल मीडियावर अय्योविषयीची ही पोस्ट करत त्यांनी सर्वांचच लक्ष वेधलं आहे. मुख्य म्हणजे यामुळे दाक्षिणात्य वर्गात भलतीच आनंदाची लाट पाहायला मिळत आहे.