मुंबई : विकृतीची परिसामा गाठणारी ही घटना आहे. माणसाने एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीच्या इतक्या आहारी जावं हे धक्कादायक आहे. जन्मदात्या आईवरच मुलाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. पॉर्न पाहण्याच व्यसन जडलेल्या तरूणाने आपल्या 46 वर्षीय आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


कुठे घडला हा प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने या प्रकाराची कबूली दिली आहे. आई झोपली असताना त्याने हा प्रकार केला आहे. पाणी पिण्याचे कारण देत तो गेला आणि त्याने आईवरच बलात्कार केला आहे. गुरूवारी रात्री 1 वाजता कामावरून आल्यावर पाणी पिण्याचं कारण देत त्याने बलात्कार केला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्मदात्या आईने याची तक्रार नोंदवली आहे. हा प्रकार घडला तेव्हा महिलेने आरडाओरड केली मात्र शेजारच्यांना वाटलं की, आपापसातील भांडण असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं. मुलाला रोज रात्री झोपताना पॉर्न पाहण्याची सवय होती. हा 20 वर्षीय तरूण आपल्या आई आणि बहिणीसमोरच पॉर्न पाहत असते. तसेच आईने दिलेल्या माहितीनुसार त्याने अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यास यापूर्वीही आईला सांगितले होते.  


आई मानसिक धक्यात  


पोटच्या मुलानंच आईवर बलात्कार केल्यानं आईला प्रचंड मानसिक धक्का बसलाय. पीडितेनं पती आणि मोठ्या मुलाला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा नोंदवला. राहुलला पोलिसांनी अटक केली असून, पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली आहे. हा प्रकार गुजरातमधील पाटणा शहरात घडला आहे.