मुंबई : कही दिवसांपूर्वी पाकिस्तानी मुलांकडून भारत देशा प्रती तिरस्कार व्यक्त करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. पाकिस्तानी मुलांच्या तिरस्काराचे उत्तर भारतीय मुलांनी अत्यंत प्रेमाणे दिले आहे. प्रेमात जग जिंकण्याची ताकद असते. भारत देश वैविधतेनं नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एका व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय मुलांनी आपल्या संस्काराचा दाखला दिला आहे. आपल्यात असलेल्या शक्तीचा वापर फक्त इतरांच्या भल्यासाठी करता आला पाहिजे. 


त्याचप्रमाणे कोणावरही अत्याचार न करता, समजदारीने आणि विचाराने सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. ही सर्व भूमी आपला कुटुंब आहे. असं हे चिमूकले या व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानच्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे.