नवी दिल्ली : दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्याकडे ती माहिती असू शकते, ज्यामध्ये या मॉड्यूलचा कोणता दहशतवादी कुठे बसला आहे हे माहित पडेल. नवरात्रीच्या दरम्यान बॉम्ब स्फोट हल्ल्याची शक्यता आहे. यावेळी ६ दहशतवाद्यांची समोरा-समोर चौकशी केली जात आहे, हे दहशतवादी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, शुक्रवारी, संपूर्ण देशाच्या दहशतवादविरोधी पथकांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक पोलीस मुख्यालयात होणार आहे, जिथे या धोक्याला सामोरे जाण्यासाठी संयुक्त रणनीती आखली जाऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या विविध भागातून 6 दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्यांची सतत चौकशी सुरु आहे. त्यांचे तर कोणी साथीदार आहेत का? आहेत तर मग ते कुठे आहेत. याचा शोध घेतला जात आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम सोबत बोलणारा समीर उर्फ जानची चौकशी करण्यासाठी मुंबई एटीएसची टीम देखील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल येथे पोहोचली आहे. पाकिस्तानातून ट्रेनिंग घेऊन आलेल्या ओसामाचे वडील मदरशाबाबत ही चौकशी सुरु आहे.


संशयित दहशतवादी ओसामा पकडला गेला आहे. पण त्याचे वडील अजून फरार आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा चिंतेत आहेत. कारण त्याच्याकडे ती लिस्ट असू शकते. ज्यांमध्ये कोणता दहशतवादी कुठे आहे याची माहिती असू शकते. कारण ओसामाचे वडील हे आयएसआयच्या मोठ्य़ा अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता.


दहशतवादी हे पोलिसांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण प्रत्येकाने वेगवेगळी माहिती दिली आहे. ओसामाचे वडील आणि त्याचा काका यांच्याबद्दल चौकशी केली जात आहे. काही दहशवतादी हे अजूनही पोलिसांच्या रडारवर आहेत. जे लवकरच पकडले जातील.


नवरात्रीदरम्यान बॉम्ब स्फोटाची शक्यता आहे. दिल्ली पोलिसाच्या मुख्यालयात शुक्रवारी अँटी टेरर कॉन्फ्रेंस होणार आहे. ज्यामध्ये जवळपास १५ राज्यातील मुख्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.