नवी दिल्‍ली : एक जुलैपासून जीएसटी लागू केल्यानंतर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होत आहे. पण आता जीएसटीमध्ये सामन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू केल्यानंतर व्यापाऱ्यांच्या विरोधाचा देखील सामना करावा लागला होता. काँग्रेसने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या जीएसटीच्या लॉन्चिंग कार्यक्रमात देखील भाग नव्हता घेतला. जीएसटीमध्ये ५ स्लॅब बनवण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटी अंतर्गत येणारे १२ आणि १८ चे स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे. दोघांच्या जागी एकच स्लॅब येण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी याबाबत संकेत दिले. अर्थमंत्र्यांनी म्हटलं की, जसे जसे जीएसटी पुढे जाईल तसं त्याच्या टॅक्स स्लॅबवर पुन्हा विचार केला जाईल. १२ आणि १८ चा स्लॅब एक देखील केला जाऊ शकतो असे देखील संकेत त्यांनी दिले.


जीएसटी लॉन्‍च होऊन एक महिना झाला आहे. सध्या जीएसटीनुसार वेगवेगळ्या वस्‍तुंवर वेगवेगळे टॅक्स आकारला जात आहे. यामध्ये ३, ५, १२, १८, २४ टक्के असे ५ स्लॅब आहेत.