IDFC Bank IDFC LTD Merger: देशातील सातत्यानं बदलणाऱ्या आर्थिक धोरणामुळं आता बऱ्याच बँकांची धोरणंही बदलताना दिसत आहेत. खातेधारांवर या साऱ्याचा नाही म्हटलं तरीही कमीजास्त परिणाम होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच नव्या उद्देशांच्या बळावर एचडीएफसी फायनान्स (HDFC Finance) आणि HDFC Bank यांचं विलिनीकरण झालं. त्यामोगमाग आता या यादीत आणखी दोन बँकांची नावं जोडली जाणार असून, त्यासुद्धा विलिनीकरण प्रक्रियेतून जाणार आहेत. 


कोणत्या बँकांचं होणार विलिनीकरण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) बोर्डाकडून बँकांच्या एकत्रीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता IDFC आणि IDFC फायनान्सच्या होल्डिंगच्या मर्जरला देण्यात आली आहे. या मर्जरची सरासरी 155:100 इतकी असेल. सूत्रांच्या माहितीनुसार या वर्षअखेरीस विलिनीकरणाची ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 


विलिनीकरण प्रक्रियेतील वाटाघाटीची सरासरी पाहता 155:100 म्हणजेच आयडीएफसीच्या 100 शेअर्सच्या मोबदल्यात IDFC First Bank चे 155 शेअर्स दिले जाणार आहेत. शेअर बाजारतही आयडीएफसी फर्स्ट बंकेकडून यासंदर्भातील सूचना दिल्या गेल्या आहेत. या विलिनीकरम प्रक्रियेमुळं बँकेला स्वत:च्या कक्षा रुंदावण्याची आणि या क्षेत्रात आणखी भक्कम पाय रोवून उभं राहण्याची मदत मिळणार आहे. 


प्रक्रियेचा काय परिणाम होणार ? 


रेग्युलेटरी फायलिंगमधून मिळालेल्या माहितीनुसार या प्रक्रियेनंतर बँकेच्या प्रती शेअर बुक व्हॅल्यूमध्ये 4.9 टक्क्यांनी वाढ होईल. या वर्षाच्या शेवटापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान, दोन्ही बँकांच्या आर्थिक उलाढालीवर नजर टाकायची झाल्यास मार्चच्या अखेरपर्यंत IDFC First Bank ची एकूण संपत्ती 2.4 लाख रुपये इतकी होती. तर, कंपनीचं एकूण टर्नओवर 27,194.51 इतकं होतं. नफ्याचं सांगावं तर, बँकेनं तब्बल 2437.13 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला होता. 


हेसुद्धा वाचा : याचं उत्तर द्याच! रेल्वे, हॉटेलांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात? 


बँकेच्या विलिनीकरणाचे नेमके फायदे काय, असा प्रश्न तुम्हालाही पडत असल्यास गैर नाही. या प्रक्रियेचा थेट फायदा बँकांना होतो. जिथं या संस्था अधिक वेगानं विस्तारतात आणि अधिकाधिक नवे ग्राहक मिळवण्यात यशस्वी ठरतात. बँकांच्या विलिनीकरण प्रक्रियेमुळं कर्मचाऱ्यांनाही गुणवत्ता पडताळणीची संधी मिळते. त्यामुळं त्यांना या क्षेत्रात करिअर आणि नेतृत्त्वाच्या संधीही वाढतात. काही दिवसांपूर्वीच एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या एकत्र येण्यानं आता HDFC ही संस्था भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरत आहे.