Post Office Bank : गुंतवलेल्या (Investment) रक्कमेची हमी आणि चांगला परतावा यामुळे अनेक जण पोस्ट ऑफीसच्या योजनांमध्ये (Post Office Scheme) गुतंवणूक करतात. जर तुम्हीही पोस्ट ऑफीस स्किममध्ये गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पोस्ट ऑफीसने एका नियमात मोठा बदल केला आहे. या नियमामुळे आता खातेधारकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. पोस्टाने याबाबतची माहिती दिली आहे. (post office changes rules of withdrawal of money mini statment know details)


एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आधार इलेब्लड पेमेंट सिस्टमद्वारे (Aeps) करण्यात येणाऱ्या व्यवहाराच्या दरात बदल केला आहे. याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार नव्या बदलाची अंमलबजावणी 1 डिसेंबर 2022नुसार करण्यात येणार आहे. तसेच जे  IPBP चे खातेधारक नाहीत, त्यांना 1 पेक्षा अधिक व्यवहार केल्यास 1 रुपया जास्त द्यावा लागणार आहे. यात आधारद्वारे रक्कम काढणं,   रक्कम जमा करणं आणि मिनी स्टेटमेंटचाही (Mini Statement) समावेश आहे. पोस्ट ऑफिसने याबाबतची माहिती दिली आहे.  


पोस्ट ऑफीसने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार खातेधारकांना ठराविक मर्यादेनंतर पैसे काढल्यास-जमा केल्यास 20 रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. तसेच मिनी स्टेटमेंटसाठी 5 रुपये द्यावे लागणार आहेत.