पोस्टात 25,000 रुपयांची गुंतवणूक करा, 5 वर्षानंतर मिळवा मोठी रक्कम
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम (NSC) ही एक गुंतवणूकासाठी चांगली योजना आणि एक अत्यंत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे.
मुंबई : Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम (NSC) ही एक गुंतवणूकासाठी चांगली योजना आणि एक अत्यंत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. जर आपण एनएससी योजनेत महिन्याकाठी 100 रुपयांची गुंतवणूक केली तर आपण काही वर्षांत लक्षाधीश होऊ शकता. (Post Office's National Saving Certificate Scheme) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना अर्थात NSCमधील आपली गुंतवणूक कोणत्याही जोखीमशिवाय सुरक्षित ठेवून पैसे कमवू देते आणि आपले तसेच आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा फायदा (Benefits of National Saving Certificate)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा (NSC)मुदतपूर्ती कालावधी 5 वर्षे आहे. तथापि, आपण एका वर्षानंतर आपल्या खात्यामधून काही अटींसह पैसे काढू शकता. आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीस (3 Months)सरकारने व्याज दर निश्चित केले आहेत.
व्याज दर काय आहे? ( interest rate)
सध्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या या योजनेत वर्षाकाठी 5.9 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला आयकर कलम 80 सी अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपये कर सूट मिळू शकते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससीसाठी व्याज अर्धवार्षिक असते. व्याज पाच वर्षांच्या शेवटी गुंतवणूकदारास देय असेल. दरवर्षी मिळविलेल्या व्याजाची पुन्हा गुंतवणूक केली जाते.
आपण या योजनेत महिन्याकाठी 100 रुपयांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात करु शकता. तुम्हाला पाच वर्षानंतर 5.9 व्याज दराने 20.06 लाख रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला पाच वर्षांत 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि तुम्हाला व्याज म्हणून जवळजवळ 5.06 लाख रुपये मिळतील.