नवी दिल्ली: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर योजना सुरू करीत असते. यात सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहेत. तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ नागरिक बचत योजना चांगला पर्याय ठरू शकते. ज्यामध्ये तुम्हाला 7.4 टक्के दराने व्याज मिळते. म्हणजेच गुंतवणुकीतून तुम्ही फक्त 5 वर्षात 14 लाख रुपयांचा मोठा फंड बनवू शकता. (Post Office Senior Citizen Savings Scheme (SCSS)


Senior Citizen Savings Scheme


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही सेवानिवृत्त असाल, तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) योजना तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. तुमची आयुष्यभराची कमाई सुरक्षित करण्यासाठी तसेच चांगला परतावा मिळवण्यासाठी ही योजना चांगला पर्याय ठरू शकते.


SCSS मध्ये खाते उघडण्यासाठी वय 60 वर्षे असावे. या योजनेत फक्त 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक खाते उघडू शकतात. याशिवाय ज्या लोकांनी व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना) घेतली आहे, ते लोकही या योजनेत खाते उघडू शकतात.


जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक योजनेत 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर 5 वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर वार्षिक 7.4 टक्के व्याजदराने गुंतवणूकदारांना एकूण रक्कम 14 रुपये मिळतील. 


फक्त हजार रुपयांत उघडा खाते


या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपयांची रक्कम गरजेची आहे आहे. तसेच 15 लाख रुपयांहून अधिक रक्कम खात्यात ठेवू शकत नाही.


याशिवाय जर तुमचे खाते उघडण्याची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही रोख पैसे देऊनही खाते उघडू शकता. एक लाखाहून जास्त रक्कमेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला चेक द्यावा लागेल.


मैच्योरिटी पीरियड 


SCSS चा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, परंतु गुंतवणूकदाराची इच्छा असल्यास ही मुदत वाढवता येऊ शकते. इंडिया पोस्ट वेबसाइटनुसार, तुम्ही ही योजना मॅच्युरिटीनंतर 3 वर्षांसाठी वाढवू शकता.